मी आणि माझा एक खेड्यातील मित्र
दोघेही 12वी झाल्यानंतर उन्हाळ्यात पुण्याला एका कॉल सेंटर कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो.

इंटरव्ह्यू देण्यासाठी जवळपास 50 कॅन्डीडेट्स फ्रंट ऑफिस मध्ये बसलेले होते. बाजूला एक व्यक्ती बसलेला होता. माझ्या वयापेक्षा जवळजवळ 10 वर्ष मोठा असेल बहुतेक तो.
आम्ही एकमेकांची विचारपूस केली. मी नंतर त्याला विचारलं की तुम्हीपण इंटरव्ह्यू द्यायला आलेय का?
तर तो हो म्हणाला आणि नंतर कळालं की तो M.Sc. B.Ed. असून आता Ph.D. पण करत आहे.
आणि इथं जॉबसाठी आलाय तेही 8 हजार रुपये पगाराची नोकरी.

बापरे... त्या वेळी थोडं नवल वाटलं होतं पण आता तसं काही वाटत नाही कारण आता माहीतीय की आज त्याच्यासारखे लाखो लोक आहेत जे
वयाची तीशी ओलांडल्यानंतरही जॉब शोधतात तोही 10/15 हजार रुपयांचा.

मग आमचा पहिला राऊंड झाला, तर त्यात माझा मित्र पहिल्याच राउंडमध्ये फेल झाला, कारण 
इंग्लिश
त्याला इंग्रजी बोलता येत नव्हते, तर त्याचं तिथं तत् मम् झालं.
त्यामुळे त्याच सिलेक्शन झालं नाही.

दुसरा राउंड टायपिंग टेस्टचा होता. माझ्या बाजूला जो‌ व्यक्ती बसलेला होता त्याची टायपिंगची स्पीड थोडी कमी आली. 
मग काय तर नाईलाजाने त्याचंही सिलेक्शन ‌‌‌‌‌‌‌झालं नाही.

तेवढं बरं झालं होतं की सुदैवाने मी अकरावी मध्ये माझं टायपिंग आणि MS-CIT कोर्स पूर्ण केला होता. त्यामुळे मी तो राऊंड पास झालो. माझं सिलेक्शन झालं.
नंतर एक महिन्याचे ट्रैनिंग घेऊन मी कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून ऑफिस जॉईन केले. मग काय दररोज 8 तास ड्युटी आणि नंतर मित्र-मैत्रिणींसोबत एन्जॉय!
कधी शॉपिंग, तर कधी कॅन्टीन, तर कधी सिनेमा हॉल.
अशी मस्त लाईफस्टाईल मी जगू लागलो.

पण 7/8 महिने झाले आता मात्र पैशांची चण-चण भासायला लागली होती, कारण रूमचं भांड 2 हजार, मेसला 2 हजार, चहा-पाणी, नाष्टा, रिचार्ज, ई. सर्व यांचे 2 हजार आणि गाडीचा हफ्ता 2 हजार....
झाले ना
पगार किती.. 8429 रूपये
आता 1 वर्ष झालं तरी घरी 1 रूपया पाठवला नव्हता.
मग आता थोडं टेन्शन आलं. आता काही तरी नवीन जॉब शोधला पाहिजे असे वाटू लागले. भरपूर ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला गेलो, मात्र पगार 10 हजारांच्या वर नाही.

बापरे..‌ आता माझ्यावर वेळ आली होती आणि मी खचून गेल्यासारखं वाटत होतं आणि अनेक इंटरव्ह्यू दिल्यानंतर एक जाणीव पण झाली होती की मीच कुठेतरी कमी पडतोय. मी स्वतःला अपडेट केलेलं नव्हतं.

अशा प्रकारे मला माझ्या चुका लक्षात आल्या आणि मी योग्य ते पाऊले उचलायला सुरुवात केली.

तर मित्रांनो
या अनुभवातून आपल्याला काही शिकण्यासारखे आहे.

गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही, हे तर आपल्याला माहीतच आहे. म्हणून आज जो आपल्याला फ्री वेळ मिळतोय, तर त्याचा सदुपयोग करून घ्यायलाच पाहिजे, नाही का?

तर आतापासूनच तुमच्या फ्री वेळेत या पाच गोष्टी करायला सुरुवात करा.


1
Learn To Speak English

होय, आपण दररोज इंग्रजी बोलण्यासाठी जे काही करता येईल ते करायला हवं. कारण आज प्रत्येक क्षेत्रात इंग्रजी गरजेचे बनलेले आहे.



2
Read A Lot of Books

हे नंतर मला कळून चुकलं की आजपर्यंत जे पण यशस्वी लोक झालेत, तर त्यांना एक चांगली सवय आहे, ते म्हणजे विविध पुस्तकांचे वाचन.

हे खरंय की
पुस्तकाने विचार घडतात आणि विचारांनी माणूस
तर किमान एका आठवड्यात किंवा एका महिन्यात एकतरी पुस्तक वाचून झालं पाहिजे.



3
Learn New Skill

यशस्वी लोक स्वतःला नेहमी अपडेट ठेवत असतात. त्यांच्याकडे एक चांगला गुण असतो
Learning Attitude
हे लोक नेहमी नवीन काहीतरी शिकत असतात. जे त्यांना काही माहित नाही ते शिकुन घेतात.
आज अशा कितीतरी गोष्टी आहेत, स्किल्स आहेत जे आपण शिकू शकतो.



4
Exercise And Meditate

शरीराचा आणि मनाचा व्यायाम केल्याने आपण निरोगी आणि सुदृढ राहतो. यामुळे आपल्या डोक्यावरील ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.



5
Start A Business

बऱ्याच जणांना व्यवसाय सुरू करण्यासाठीचा एक गैरसमज असतो तो म्हणजे व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी आधी पैशांची गुंतवणूक लागते.
रिसर्च नुसार आज जगामध्ये 2200 सेल्फ मेड बिलेनिअर आहेत, म्हणजे ज्यानी स्वत: शुन्यापासुन सुरुवात करून त्यांचे यशस्वी उद्योग-व्यवसाय सुरू केलेले आहेत.
तर पैशापेक्षा जास्त महत्त्वाची आहे तुमची आयडिया आणि त्यासाठी तुम्ही दिलेला वेळ.
तसेच या इंटरनेटच्या युगात आपण घरबसल्या एखादी नवीन कल्पना अस्तित्वात आणून व्यवसाय सुरू करू शकतो.



थोडक्यात काय तर स्वतःला नेहमी अपडेट ठेवत चला, नाही तर आपण आउटडेटेड होणारच!

Pawan Bhakade, MPSC Mentor
E4 Team

(पोस्ट कॉर्नर +)™

E4 Post Corner + (महत्त्वाचे बोलू काही) या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. इथे तुम्हाला उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!

तुमच्या मित्रांना शेअर करा??


तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या ॲडमिनला पाठवा किंवा संपर्क करा.
E4 Team
---------------------------------------------

Join Whatsapp Group