स्टीव्ह जॉब ने कॉलेज ड्रॉप आऊट केल्यानंतर गंमत म्हणून कॅलिग्राफीचा क्लास केला आणि एप्पल मेकिटॉंश या जगातल्या पहिल्या व्यवसायिक कम्प्युटरमध्ये त्याचा वापर केला, मेटिकॉंश तुफान लोकप्रिय झालं. एप्पल ब्रँड बनला...
असं आहे
कधीतरी शिकलेली कोणती गोष्ट कुठे कामाला येईल सांगता येत नाही, त्यामुळे आपण सतत शिकत राहायचं.
म्हणून काहीही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. एखादी नवीन गोष्ट शिकलेली बरी,
बरोबर नाही का...?
तर खरं म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण पण खूप बिझी आहोत, आपल्याला वेळ नाही, आपल्या मागे खुप काम आहे, आता आपलं वय झालं,
ही आपली शिकायची वेळ नाही, अशी शेकडो कारणे आपण देत असतो.
परंतु खरंच असं आहे का की दिवसातून 24 चे 24 तास आपण बिझी राहतो?
पूर्ण दिवसभरातून कमीत-कमी दहा मिनिटं,
वीस मिनिटं, एक-दोन तास का होईना आपल्याला वेळ मिळतोच मिळतो.
फक्त काही लोकांना समस्या अशी आहे की त्यांचा वेळ नेमका जातो कुठे हेच कळत नाही.
तर यासाठी मी म्हणेल की
आपण आपल्या दिवसभरातील कामांची यादी
तयार करावी, त्यात सर्वात महत्त्वाची आणि गरजेचे कामे कोणती आणि ती कामे करण्यासाठी लागणारा वेळ किती हे चेक करावे.
तसेच बिनकामाच्या आणि गरजेच्या नसलेल्या कामांची यादी करावी आणि त्यासाठी किती वेळ वाया घालवतो, ते बघावे.
तर हाच वेळ उपयोगात आणून
याच वेळेमध्ये फक्त दहा मिनिटं, वीस मिनिटं किंवा अर्धा-एक तास आपण कुठलंतरी एखादं नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ देऊ शकलो पाहिजे.
दुसरा प्रश्न असा येतो की नवीन शिकावं
तरी काय?
तर अशा हजारो गोष्टी आहेत शिकण्यासाठी ज्या आपल्याला गुगल आणि युट्युब वर सहज मिळतिल.
फक्त तुम्हाला गरजेचा किंवा आवडीचा विषय शोधावा.
त्याच्याशी संबंधित पुस्तकांचे वाचन करावे, गुगल आणि युट्युब वर सर्च करून ते वाचावे आणि बघावे. शक्य झालं तर एका नोटबुक मध्ये त्या विषयावरच्या स्वतःच्या तुमच्या नोट्स लिहाव्यात.
काही सांगता येणार नाही की आज आपण एखादी शिकलेली गोष्ट उद्या भविष्यात कुठे ना कुठेतरी कामी येईल.
Learning is a lifelong process.
So
Always keep learning
लेखक
राहुल गडकरी
मातोश्री जिजाऊ प्राथमिक विद्यालय, औरंगाबाद येथे प्राथमिक शिक्षण असून e4 टीमचे सदस्य आहेत
(पोस्ट कॉर्नर +)™
E4 Post Corner + (महत्त्वाचे बोलू काही) या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. इथे तुम्हाला उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!
तुमच्या मित्रांना शेअर करा??
तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या ॲडमिनला पाठवा किंवा संपर्क करा.
E4 Team
---------------------------------------------