मित्रांनो,
या पृथ्वीतलावर असा एकही मनुष्यप्राणी सापडणार नाही की त्याला काही समस्या नाहीत. समस्यां नसणारा प्राणी सापडणे कठीणच आहे.
मनुष्य कितीही श्रीमंत असला म्हणजे तो समस्यामुक्त आहे, असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही किंवा मनुष्य सर्वज्ञानी जरी असला तरी त्याला समस्या नाही असे घडणे शक्य नाही. प्रत्येकाला त्याच्या जीवनप्रवासात दुःख, संकटं यांचा सामना करीतच पुढे जावे लागते.
काही माणसं त्यांच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाकडे पाहिलं की खूप समृद्ध व सुखी वाटतात, पण त्यांना आतूनच एखादी समस्या पोखरत असते. पण ते इतरांना दिसत नाही. याबाबतीत माणसं ही दोन प्रकारची असतात.
पहीला
Power Person / Positive Person
व दुसरा
Peer Person / Negative Person
पावर पर्सन या गटात मोडणाऱ्या व्यक्तीला कितीही समस्या असल्या तरी तो त्या समस्या आपल्या व्यक्तिमत्त्वातून इतरांना दाखवणार नाही. कितीही संकटे आली तर तो न डगमगता त्या संकटांचा सविस्तर अभ्यास करेल, त्याचे मूळ कारण शोधून काढेल, त्यांच्या दुष्परिणामांची यादी बनवेल, त्या सोडवता येणाऱ्या पर्यायांचा शोध घेईल. एखादा पर्याय अमलात आणेल, त्याचे व्यवस्थित नियोजन करून सहज वृत्तीने तो सोडवण्याचा प्रयत्न करेल.
हा व्यक्ती भावनेने नव्हे तर डोक्याने काम करेल. वास्तव किंवा प्रॅक्टिकली विचार करेल व खंबीरपणे उभा राहून आपल्या दैनंदिन जीवन शैलीवर त्याच समस्यांचा काही परिणाम तर होणार नाही ना याची काळजी घेईल.
पॉझिटिव्ह पर्सनला समस्या किंवा संकटं नसतात असे नाही, इतरांसारखे त्यांनासुद्धा अडचणी, दुःखद घटना किंवा बॅड पॅच मधून जावेच लागते. पण ही व्यक्ती त्या दुःखांना कवटाळून बसत नाही.
कितीही मोठे संकट आले किंवा रडण्याची वेळ आली तरीही ते त्या दुःखात ठरवलेल्या वेळेपर्यंत राहतात व लगेच दुसर्या क्षणाला त्यातून बाहेर पडतात. कारण त्यांना माहित असतं की आपण संकटांना घाबरून रडत बसलो की लगेच दुसरे संकट एकामागून एक येण्याची शक्यता निर्माण होते व चोहीबाजूंनी परिस्थिती आपल्यावर चाल करून येते. तेव्हा आपली ताकद कमी पडून आपण कोलमडून पडतो.
म्हणून विषारी सापाचे पिल्लू जवळ बाळगायचे नसते कारण ते मोठे झाले तर कधी ना कधी ते आपला बळी घेणार हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. अशा व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यातून कधीच निराशा, समस्या किंवा ताणतणाव व्यक्त होत नाही. अशा व्यक्तीलाच पावर पर्सन असं म्हणलं जाते आणि अशीच व्यक्ती सर्वांनाच आवडते. पावर पर्सन स्वतःच्या समस्या स्वतः सोडवतातच पण ते इतरांनाही त्यांच्या समस्या सोडवण्यात मदत करत असतात.
पावर पर्सन नंतर मनुष्याचा दुसरा प्रकार असतो तो म्हणजे पियर पर्सन. मित्रांनो तुम्हाला पूर्वीपासूनच हे सांगितले गेलेले आहे की आपले दुःख इतरांशी शेअर केले तर त्या दुःखांची त्रीवताही कमी होत असते आणि थोडं हलकंही वाटतं, हे खरंय.
पण आपण हे विसरतो की इतर म्हणजे सगळेच नव्हे. तुमच्या कठीण प्रसंगांचा फायदा घेणारे आपले हितशत्रू पण असतात. आपलं दुःख किंवा समस्या कोणाशी शेअर कराव्यात व कुणाशी करू नयेत, हेही या लोकांना समजत नाही. उठ सूट ही लोकं प्रत्येकाजवळ आपल्या समस्या मांडत सुटतात, आपल्या वैयक्तिक समस्या, अडचणी शेअर करतात. आपल्यातील कमकुवतपणाचे प्रदर्शन करत असतात. त्यांनाच पियर पर्सन असे म्हणतात.
जर जवळचा मित्र किंवा आप्तेष्ट म्हणून तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल, आर्थिक अडचणीबद्दल, नातेसंबंधाबद्दल एखाद्याजवळ चर्चा करता तेव्हा तुमची आर्थिक, मानसिक, कौटुंबिक, शारीरिक परिस्थिती कशी आहे, तुमची स्ट्रेंथ किंवा बलस्थाने काय आहेत. तसेच तुमचे विक पॉईंट्स अर्थात तुमची कमजोरी काय आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत असते. त्यावरून तुम्ही आर्थिक अडचणीत आहात, पैशाची गरज आहे, कदाचित तुम्ही पैसे मागू शकता म्हणून समोरील व्यक्ती तुम्हाला टाळण्याची शक्यता निर्माण होत असते.
मनमोकळेपणाने जेव्हा तुम्ही एखाद्याशी बोलता तेव्हा तुमचा जर भित्रा स्वभाव असेल तर ते पुढच्या व्यक्तीला कळतं. भविष्यात तुमच्या या स्वभावाचा कदाचित तो गैरफायदा घेण्याची शक्यता निर्माण होते.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात एकीकडे पावर पर्सन जिंकत असतात, ते असामान्य जीवन जगत असतात तर दुसर्या बाजूला पियर पर्सन लहान-लहान गोष्टींसाठी आयुष्यभर संघर्ष करत सामान्य जीवन जगत असतात.
मित्रांनो, आपली परिस्थिती मग ती कोणतीही असो आर्थिक, कौटुंबिक, नातेसंबंधाविषयी किंवा मानसिक स्थिती असो आपल्या वागण्या-बोलण्यातून, व्यवहारातून किंवा आपल्या बॉडी लैंग्वेज अथवा देहबोलीतून ती इतरांना कधीच कमजोर वाटता कामा नये, याची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे.
एखाद्याची सहानुभूती मिळवण्यासाठी आपण जेव्हा आपली एखादी बाजू किती व कशी कमकुवत आहे हे आपल्या बोलण्यातून किंवा वागण्यातून दाखवतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला तात्पुरती तुमची दया येईल पण तो नेहमी तुमच्या उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
कारण एका यशस्वी व खंबीर माणसाला दुसऱ्या यशस्वी व खंबीर माणूसच आवडत असतो.
तो कधीही रडक्या किंवा कमजोर माणसाशी मैत्री ठेवणार नाही. तुम्हाला जर त्या यशस्वी व आत्मविश्वासू पावरफूल पर्सन सारखे बनायचे असेल तर त्याच्या यशावर जळून चालणार नाही किंवा त्याच्या समोर रडून पण जमणार नाही तर त्याच्याशी तुम्हाला मैत्रीच करावी लागेल. केवळ मैत्री करून जमणार नाही तर त्याला आवडणाऱ्या गोष्टी तुम्हाला आत्मसात करणे गरजेचे आहे.
तर आताच आपण पावर पर्सन व्हायचंय तर -
Let's Begin To Change....
(पोस्ट आवडल्यास तुमचे मत सांगायला विसरू नका)
e4 team
Ads
(पोस्ट कॉर्नर +)™
E4 Post Corner + (महत्त्वाचे बोलू काही) या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. इथे तुम्हाला उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, इंग्रजी, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!
तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या ॲडमिनला पाठवा किंवा संपर्क करा.
-------------------------------------------------------------
e4 team
Join | Share | Support
Join WhatsApp Group