मित्रांनो कधी कधी आपल्याला लोकं टोचून बोलतात. आपण काही चुकी केली नसताना आपला अपमान करायचा प्रयत्न करतात. आपल्यामध्ये दोष काढतात. मग अशा वेळेस आपण दुखावतो, निराश होतो, गोष्टी मनाला लावून घेतो. 


तुम्ही जर अशा लोकांपैकीच असाल की ज्या गोष्टी मनाला लावून घेतात तर मग हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखातले मर्म तुम्हाला कळाले तर फालतू लोकांच्या गोष्टी मनाला लावून घ्यायचे तुमचे प्रमाण 100 टक्के कमी होईल.


मित्रांनो समजा एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही पांढरे स्पोर्ट्स शूज घातले आहे. तुम्ही मित्राला भेटायला जाता तेव्हा तुमचा मित्र तुम्हाला म्हणतो, "काय रे, एका पायात पांढरा आणि एका पायात काळा बूट का घातला आहे?"

तुम्ही थोडं आश्चर्य व्यक्त करता. त्याला तुम्ही म्हणता, अरे नीट बघ मी पांढरेच बूट घातले आहेत. तरी तो तुम्हाला म्हणतो, नाही तो दोन्ही पायात वेगवेगळी बूट घातले आहे आणि तू खूपच विचित्र दिसत आहे.

तुमचा प्रतिसाद काय असेल. एक तर तुम्हाला हसू येईल, तुम्ही थोडं हैराण व्हाल. पण तुम्ही जे तो म्हणाला ते मनाला लावून घेणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे बूट बरोबर घातले आहे. बाकी कोणाला नाही फक्त याला फरक जाणवतोय म्हणजे प्रॉब्लेम त्या मित्रात आहे, त्याच्या नजरेत आहे, त्याच्या विचारात आहे.


ह्या गोष्टीवरून आपल्याला हे शिकायला भेटते की याने काही फरक पडत नाही की लोक तुमच्या बद्दल काय बोलतात. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहात तर मग लोक काही बोलू दे त्याचा काही परिणाम होणार नाही. लोकांमध्ये तेवढा दम नाही की ते तुम्हाला त्रास, मनस्ताप देऊ शकतील जोपर्यंत तुम्ही तुमच्या विचारांनी, भीतींनी त्रास करून घेत नाही.


No one can disturb you until you disturb yourself.


मित्रांनो तुम्हाला लोक नाव ठेवतील, काळा गोरा म्हणतील, बुटका, लंबू, जाड्या म्हणतील, पुस्तकी किडा काही पण म्हणतील. कारण लोकांचे कामच आहे नाव ठेवणे. तुमच्यातले दोष काढणे. पण लक्षात ठेवा या जगात तुम्ही प्रत्येक माणसाला खुश नाही ठेवू शकत. कारण प्रत्येकाला खुश ठेवायला गेलो तर आपल्या आयुष्याची वाट लागेल आणि जे लोक कधी खूश होणार नाही त्यांना कशाला खुश ठेवायच्या प्रयत्नांमध्ये आपली एनर्जी वाया घालवायची आणि ज्यांना तुमच्याबरोबर राहायला आवडतं ते तुमच्याकडे काही नसतानासुद्धा खूश राहतील.


त्यासाठी तुम्ही जसे आहात तसेच स्वतःला स्वीकारा. ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये असतील त्यात सुधारणा करा, स्वतःवर प्रेम करा, मी आहे तसा आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःवर प्रेम असेल, स्वतःच्या आयुष्यावर प्रेम असेल, शरीराबद्दल प्रेम असेल, तेव्हा तुमचा आत्मविश्वास जबरदस्त वाढेल. कोण तुमच्याबद्दल काय बोलतेय तुम्हाला कोणताही फरक पडणार नाही. 


त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, आयुष्यावर प्रेम करा कारण आयुष्य खूप सुंदर आहे.


e4 team


(पोस्ट कॉर्नर +)™

E4 Post Corner + (महत्त्वाचे बोलू काही) या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. इथे तुम्हाला उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, इंग्रजी, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!


तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या ॲडमिनला पाठवा किंवा संपर्क करा.

-------------------------------------------------------------

e4 team

Join | Share | Support

JOIN NOW