सुंदर विचार


1

संकटाच्या वेळी मदत मागाल तर

विचार करून कारण....

संकट थोड्यावेळासाठी असते पण

उपकार आयुष्यभर राहतात.


2

ज्या घावातून रक्त निघत नाही

समजून जा तो वार कोणी आपल्यानेच

केला आहे.


3

नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा

प्रयत्न करा कारण......

मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या

दगडाने ठेच लागते.


4

दुसऱ्याला संपवण्याच्या प्रयत्नात

स्वतः संपून जाल....

त्यामुळे स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या


5

जगणे हे आईच्या स्वाभिमानासाठी असावे आणि जिंकणे वडिलांच्या कर्तव्यापोटी


6

क्षेत्र कोणतेही असो...

कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की .....

यशालाही पर्याय नाही


7

केवळ ज्ञान असून उपयोग नाही.

ते कसे आणि केव्हा वापरायची याचे ज्ञानही‌ हवे.


8

माणूस स्वतःच्या नजरेत चांगला असला पाहिजे. लोकांचे काय...!

लोक चुका तर देवात पण काढतात.


9

सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,

वेळ वाया जाईल.... हि दूनिया मतलबी

झाली आहे 

त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा

चांगली वेळ येईल


10

जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात

तेव्हा समजून घ्यावे की....

तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे आहात. 


11

विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी

लागत नाही...!

तुम्ही चांगले कार्य करू लागले की आपोआप

विरोधक तयार होतात.


12

कर्तुत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला

जात नाही.

पण त्याचे चाक जमिनीत कधी अडकतय

याकडे मात्र सर्वांचे लक्ष असते. 


13

एक मात्र खरे आहे की चांगल्या रस्त्याला

गतिरोधक

आणि ‌.... चांगल्या व्यक्तीला विरोधक

असतातच.


14

चांगल्या कामाला मांजरापेक्षा

माणसंच

जास्त आडवी येतात.



15

एक सत्य...

नको असलेल्या अपेक्षा वाढल्या

की हवी असणारी माणसे

गमावण्याची वेळ येते.


16

जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर

उपाय आहेत परंतु..

मनामध्ये सर कोणी विष भरवले तर त्यावर

कोणताच उपचार नाही.


17

कधीही मिठासारखे आयुष्य जगू

नका की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता

वापर करून घेतील.


18

आयुष्यात स्वतःला कधी उध्वस्त

होऊ देऊ नका..

कारण लोक ढासाळलेल्या घराच्या विटा

सुद्धा सोडत नाही.


विचार आवडले असेल तर कृपया नक्की शेअर करा.

e4 team



 पोस्ट कॉर्नर +

(महत्त्वाचे बोलू काही)

या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. इथे तुम्हाला विविध महत्त्वपूर्ण पुस्तकांचे रिव्ह्यू दिले जातात. यामध्ये उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, इंग्रजी, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ.

अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!

तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या ॲडमिनला पाठवा किंवा संपर्क करा.

JOIN NOW


Freelacing Job

We need Whatsapp Group Admin

Interested can contact

e4 team - **********9237


Ads - 29/-