नाहीतर आपला नोकिया होईल!

Nokia!

नोकिया हा एकेकाळचा जगातील सगळ्यात मोठा मोबाईल ब्रँड. अत्यंत कार्यक्षम, टिकाऊ अशी नोकियाची स्थिती होती. पण ना नोकियाच्या मॅनेजमेंटची काही चूक, ना कामगारांचा संप, ना कोणता अपघात, ना कोणत्या सरकारची आणि देशाची बंदी. हे जगातील पहिले आणि एकमेव उदाहरण असेल की एखाद्या ब्रँड मध्ये कोणतीही चूक नसताना तो ब्रँड विकावा लागला आणि शेवटी कंपनी बंद झाली.

शेवटचे शब्द!

पत्रकार परिषदेत नोकियाच्या सीईओ ने कंपनी मायक्रोसॉफ्टला विकल्याचे जाहीर केले. ते नोकियाच्या सीईओ चे शेवटचे शब्द होते.


आम्ही कोणतीही चूक केली नाही. पण आम्ही हरलो. त्या परिषदेत सीईओ आणि त्यांची मॅनेजमेंट टीम अक्षरशः हंबरडा फोडून रडत होते. 

कोणतीही चूक नसताना जगभरात प्रसिद्ध असलेली एवढी मोठी कंपनी विकण्याची नामुष्की यांच्यावर आली होती.

काय झाले, नोकिया ही खूप चांगली कंपनी आणि ब्रँड, पण ज्या वेगाने मोबाइल क्षेत्र जगभर बदलत होते, चायना आणि इतर देशात नवीन टेक्नॉलॉजी येत होते, पण नोकिया तेव्हा आपल्या नेहमीच्या कौशल्यावर मोबाईल आणि तंत्रज्ञान घेऊन काम चालवत होते‌.

त्यामुळे जगामध्ये असणारी मोठी संधी आणि मार्केट त्यांना काबीज करता आलं नाही. त्यामुळे बाकीच्यांनी बाजारपेठ खाऊन टाकले आणि शेवटी नोकिया संपला.


मराठी माणूस!

मराठी माणूस सुद्धा असाच सहिष्णू, साधा! आपल्या विचारानी आणि ज्ञानाने परंपरे प्रमाणे चालणारा आहे. तो कोणाचंही कधीही वाईट करत नाही. इमाने इतबारे नोकरी करतो. निसर्गाच्या लहरी प्रमाणे शेती करतो. जमेल तशी प्रामाणिकपणे विठ्ठलाची, महाराजांची, गणपती, गुढीपाडवा यांची पूजा आणि उत्सव साजरा करतो. मराठी महिला निमुटपणे घर काम करतात.


मुलं असेल तशी शाळा, कॉलेज शिकून छोटी-मोठी नोकरी करतात. जशी नोकियानेही काही चूक केली नाही, तशी मराठी माणसानेही गेल्या साठ वर्षात कोणतीही चूक केलेली नाही. 

हा चांगुलपणा मराठी माणसाच्या अधोगतीला नडत असून त्याला मागे खेचतो आहे. जेव्हा बाकीचे लोक व्यापार करू लागले तेव्हा मराठी माणूस  नोकरी आणि चाकरी करत राहिला. महागाई वाढत चालली, घरात माणसे वाढू लागली आणि नोकरीचा पैसा पुरेनासा झाला. मग शेवटी वडिलोपार्जित शेतीही विकाव्या लागल्या. अशा रितीने मराठी माणूस मागे पडतोय याचं दुःखं वाटतंय!


म्हणून जर मराठी माणूस लवकर जागा झाला नाही त्याचा नोकिया झाल्याशिवाय राहणार नाही. 

Ram Bhosale, Dehed

E4 Team


(पोस्ट कॉर्नर +)™

E4 Post Corner + (महत्त्वाचे बोलू काही) या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. इथे तुम्हाला उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!


तुमच्या मित्रांना शेअर करा??

तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या ॲडमिनला पाठवा किंवा संपर्क करा.

E4Team

---------------------------------------------

Join Whatsapp Group

JOIN NOW