आचार्य चाणक्य असे व्यक्ती होते ज्यांनी आपल्या विद्वत्ता, बुद्धिमत्ता आणि क्षमतेच्या जोरावर भारताचा इतिहास बदलून टाकला. चाणक्य, कौटिल्य, विष्णुगुप्त ही त्यांचीच नावे आहेत.


चाणक्य असे बुद्धिमान व्यक्ती होते की जग आजही त्यांच्या बुद्धीमत्तेची दाद देते. चाणक्य एक महान साहित्यकार, शिक्षक, दर्शनशास्त्री, राजनीती तज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, सल्लागार होते त्यांनी चंद्रगुप्त सारख्या साधारण व्यक्तीला भारत देशाच्या सर्वात मोठ्या साम्राज्याचा सम्राट बनवले.


एवढी वर्षे झाली तरीही त्यांनी त्यांच्या सांगितलेल्या गोष्टी, त्यांचे सिद्धांत, तत्व आणि नीती आजही व्यवहारिक आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक क्षेत्रात उपयोगी आहे. तर या लेखात महान पंडित आचार्य चाणक्य यांचे दहा विचार आपण बघणार आहोत.



विचार - 1

आवश्यकतेपेक्षा अधिक प्रामाणिक होऊ नका कारण लोक सरळ झाडाला सर्वात आधी कापतात


विचार - 2

कधीच वाईट लोकांच्या चांगल्या शब्दावर विश्वास ठेवू नका कारण ते त्यांचा मूळ स्वभाव विसरत नाहीत. वाघ हिंसा करणे कधीच सोडत नसतो.


विचार - 3

उंच इमारतीवर कावळे बसले तर त्यांना गरुड म्हणता येणार नाही, त्याच प्रमाणे व्यक्तीचा आदर त्याच्या गुणांद्वारे निश्चित केला जातो. त्याची उंची, स्थिती किंवा संपत्तीवरून नाही.


विचार - 4

फुलांचा सुगंध केवळ वाऱ्याच्या दिशेने पसरतो, परंतु चांगल्या व्यक्तीची कीर्ती सर्व दिशांना पसरते.


विचार - 5

सोन्याचे परीक्षण करण्यासाठी त्याला अग्नीत जाळले जाते त्याचप्रमाणे मनुष्यावर येणारे आरोप त्याचे परीक्षण करत असतात.


विचार - 6

आपल्या समस्या इतरांना कधीच सांगू नका कारण लोक आपल्या कमजोरीचा आनंद घेतात, त्यावर हसतात आणि त्याचा फायदा घेतात.


विचार - 7

आयुष्यात काही गोष्टी शिकताना, व्यवसाय करताना आणि जेवण करताना लाज पूर्णपणे सोडले पाहिजे.


विचार - 8

एकदा एखाद्या गोष्टीवर काम करणे सुरू केल्यानंतर अपयशाला घाबरू नका आणि ते काम कधीच अपूर्ण सोडू नका. जे लोक प्रामाणिकपणे आपले काम करून आपले स्वप्न पूर्ण करतात, तेच लोक नेहमी आनंदी राहतात.


विचार - 9

नशिबात आलेली गरीबी काढून टाकता येते, स्वच्छ असतील तर साधे कपडे देखील सुंदर दिसतात, गरम असेल तर बेस्वाद जेवणही चवदार वाटते.

त्याच प्रमाणे सौंदर्य संपत्ती नसेल तरीही चांगले गुण असलेला व्यक्ती सर्वांना आवडतो.


विचार  -10

उच्च विचार नसलेल्या पत्नीसोबत राहणे, पाठीवर वार करणाऱ्या मित्रांसोबत मैत्री करणे, नेहमी बोलत राहणाऱ्या व्यक्तीसोबत काम करणे हे सर्व विषारी साप असलेल्या घरात राहण्यासारखे आहे.


एकेक विचार स्वतःच्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात अपयश येणार नाही. तुम्हाला हरवण्याची हिम्मत कोणालाही राहणार नाही.



संकलन

Pawan Bhakade, MPSC Aspirant, Pune

MA, Sociology


(पोस्ट कॉर्नर +)™

E4 Post Corner + (महत्त्वाचे बोलू काही) या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. इथे तुम्हाला उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!


तुमच्या मित्रांना शेअर करा??

तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या ॲडमिनला पाठवा किंवा संपर्क करा.

E4 Team

---------------------------------------------

ग्रृप जॉईन करण्यासाठी खालील नाववर क्लिक करा

(पोस्ट कॉर्नर +)™