तुमच्या मनात एखादी आयडिया आली

त्यावर तुम्ही विचार केला

निर्णय घेतला

स्वतःच एक ध्येय ठरवलं

आणि ते कसं पूर्ण करणार, त्याचा प्लॅनही ठरवला

आता काय राहीलं

(Action)

तर

बऱ्याच वेळा आपण एखादी गोष्ट करायची ठरवतो, मग ती लहान असो किंवा मोठी. त्याचा  विचार करतो, प्लॅनही बनवतो, 

मात्र ज्यावेळी कृती करायची वेळ येते, तर तेव्हा आपण कृती (Execute) करण्यास कमी पडतो.

तर यामुळे आपला

टाईम पास

आणि

टाईम वेस्ट

होणारच, यात काही शंका नाही.

तसेच

जर आपण आपल्या आसपासच्या लोकांना विचारले की तुम्ही स्ट्रॅटेजी बनवण्यात निपून आहात की एक्झिक्युट करण्यात, तर मॅक्झिमम लोकांचे उत्तर असेल की आम्ही स्ट्रॅटेजी बनवण्यात निपून आहोत.

अगदी आपण विद्यार्थी जीवनाचा विचार केला तर शाळा, कॉलेज सुरू होताच आपण अभ्यासाचा प्लॅन बनवतो, त्या प्लॅनला स्ट्रॅटेजिकली डिझाईन करतो.

रोज तीन तास अभ्यास, त्याचे वेगवेगळ्या विषयांमध्ये वाटणी, त्याची रिविजन, सर्व गोष्टींचा आपण आपल्याच स्ट्रॅटेजी मध्ये समावेश करतो.

आणि पूर्ण जोमाने कामाला लागतो. तर होते काय मॅक्झिमम लोकांचे उत्तर असते की आम्ही ते स्ट्रॅटेजीकली एक्झिक्युट करण्यात अपयशी ठरतो.

आपल्याकडे भरपूर ज्ञान असते. भरपूर आयडियाज असतात तरीही आपण त्याचे कन्वर्जन करून एक्झिक्युट करण्यात कमी पडतो. 

म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही एक्झिक्युशन करण्यामध्ये जास्त लक्ष केंद्रित करा. 




तर मी आज आपल्याला 

The 4 Disciplines of Execution

या पुस्तकात दिलेला 4dx हा फार्मुला सांगेन ज्यामध्ये  चार स्टेप्स दिलेल्या आहेत.

त्याच्या मदतीने आपण ठरवलेला प्लॅन प्रॉपर्ली एक्झिक्युट कसा करावा हे समजेल.


1

Focus on the wildly Important Goal

जर तुम्हाला पुढच्या दोन वर्षात तुमची कमाई पन्नास हजाराहून एक लाख रुपये न्यायची असेल तर स्वतःला प्रश्न विचारा हा गोल पूर्ण करण्यासाठी मी काय केले पाहिजे, आणि त्यासाठी आज पासून मी काय बदल करू शकतो. तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर असेल तर ते असेल तुमचं

Widely Important Goal

तुमच्या दिवसभराच्या कामात, या कामाला सर्वात आधी संपवा, याला जास्त महत्त्व द्या.


2

Act on the Lead Measures


जेव्हा तुम्ही ठरवता की तुमची कमाई पन्नास हजारावरुन एक लाखापर्यंत न्यायची आहे, तर तेव्हा तुम्ही अगदी जोमाने कामाला लागता. त्यासाठी तुम्ही महिनाभर अगदी मनापासून कामही करतात. पण एका महिन्यानंतर तुमच्या कमाईमध्ये काहीच फरक पडलेला नसतो. अशावेळी आपण निराश होतो आणि जोमाने काम करणे सोडून देतो.

पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे कुठल्याही कामासाठी आपण घेतलेली ॲक्शन आणि त्यापासून मिळणारे रिझल्ट यामध्ये एक लॅग असतो.

हा लॅग म्हणजे काही काळ असतो, ज्यामध्ये आपल्याला काहीच रिझल्ट मिळत नाही. काही लोकांसाठी हा काळ कमी असतो तर काही लोकांसाठी जास्त असतो.

त्यामुळे आपण लॅग रिझल्ट वर फोकस न करता लीड ॲक्शन वर फोकस केले पाहिजे.


3

Keep a compelling Scoreboard


आपण मेंटेन करत असलेल्या जर्नलवर व आपल्या कामाच्या ठिकाणी स्कोर बोर्ड ठेवा. तो आपल्याला कायम समोर दिसेल असा ठेवा. जसे क्रिकेटमध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला किती रन्स हवे आहेत, हे कळण्यासाठी जसा स्कोर बोर्ड असतो. तसंच तुमच्या लीड ॲक्शन मोजण्यासाठी एक स्कोर बोर्ड असावा.

यामुळे तुम्ही तुमच्या प्रगतीचा हिशोब ठेवू शकाल.


4

Create a cadence of Accountability


याचा अर्थ म्हणजे आपल्या प्रगतीचा हिशोब ठेवणे. आपल्यासारखेच ध्येय असणारा मित्र शोधा.

हप्त्यातून एकदा दोघांनी एकमेकांना आपल्या कामाचा हिशोब द्या. या आठवड्यामध्ये ठरवलेली कामे तुम्ही पूर्ण केले की नाही ते एकमेकांना सांगा आणि नसतील केले तर छोटीशी दंडाची रक्कम भरा.

असे केल्याने आपल्या मेंदूला नुकसान झाल्याची जाणीव होईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण आपले ठरवलेलं काम पूर्ण करण्यासाठी जास्त प्रयत्न करू. 


तर अशा या चार गोष्टी या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत, ज्या आपल्याला आपल्या कृती प्रत्यक्षात आणण्यासाठी खूप मदत करतील.

हे पुस्तक आपण वाचायला हवं.


Vishal Binniwale, B.Tech Student

E4 Team


जर आपल्याला हे पुस्तक हवं असेल तर व्हॉट्सॲप आयकॉन वर क्लिक करून पुस्तकाचे नाव टाइप करून पाठवा.


(पोस्ट कॉर्नर +)™


E4 Post Corner + (महत्त्वाचे बोलू काही) या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. इथे तुम्हाला उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!


तुमच्या मित्रांना शेअर करा??

तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या ॲडमिनला पाठवा किंवा संपर्क करा.

E4 Team

---------------------------------------------

Join WhatsApp Group

JOIN NOW