व्यवसाय करायला कोणते गुण हवे?
नेता
व्यवसाय मालकाला चांगला नेता होणे फार आवश्यक आहे. त्याच्या हाताखाली नेहमी लोक काम करतात. त्या लोकांकडून त्याला काम करवून घेता आले पाहिजे. त्याला लोकांना प्रशिक्षित करता आले पाहिजे. नाहीतर तो आपल्या व्यवसायात अडकून जाईल आणि तिथला कर्मचारी बनून जाईल.
तुम्ही अनेक कपड्याचा दुकानात हे दृश्य पहिले असेल की मालक गुजराती, मारवाडी लोक आहेत. जे फक्त काउंटरवर पैसे घ्यायचं काम करतात. आपल्याला कपडे दाखवणे. बिल तयार करणे हि सर्व कामे मराठी माणसे करतात. अनेक दुकानात तुम्हाला दिसून येईल कि Manager हा मराठीच आहे आणि मालक हजर नसताना पण तेच दुकान चांगल्या प्रकारे चालत आहे.
जो माणूस Manager बनू शकतो तो मालक का नाही? त्या दुकानाच्या मालकाने एका इमानदार आणि कर्तुत्वशील माणसाला नोकरीवर ठेवण्यात यश मिळवले आहे. आता तो आपल्या दुसऱ्या व्यवसायाकडे लक्ष्य द्यायला तयार झाला आहे. कोणत्या समाजा बद्दल असंतोष पसरवणे हा उद्देश नाही, तर फरक लक्ष्यात घेऊन स्वतः मध्ये सुधारणा घडवणे आहे.
अनेक लोक स्वतःच्या व्यवसायात नोकरी करू लागतात त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढीवर ते स्वत:च बंधन लावतात.
विकता येणे
विकता येण का आवश्यक आहे? आपण सर्वजण काय करतोय? नोकरीच्या मुलाखतीला तुम्ही जाता तेव्हा तुम्ही काय करता? लग्नासाठी स्थळ पाहायला जाता तेव्हा तुम्ही काय करता? नातेवाईकांना, मित्रांना तुमच्या नवीन विकत घेतलेल्या गोष्टी दाखवताना काय करता? बॉस ला गुड मॉर्निंग बोलून काय करता? तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला दिसली कि तुम्ही काय करता? आपण स्वतःला विकत असतो. स्वतःला विकणे म्हणजे पैशासाठी काहीही करायला मी तयार आहे आहे, असे नाही. तर दुसऱ्याच लक्ष्य स्वत:वर ओढवणे दुसऱ्यांना म्हणने मी चांगला आहे. माझी निवड करा. आपण जीवनात स्वत:ला विकतच असतो. आपल्याकडची गोष्ट किंवा आपल मत इतरांना पटवून देणे हि विक्रीकलाच आहे.
व्यवसाय म्हणजे काय? वस्तूंची देवाणघेवाण, खरेदी विक्री. म्हणजे जेव्हा लोक तुमच्याकडून विकत घेतील, तेव्हा तुम्ही व्यवसाय करू शकाल. आता लोकांनी तुमच्याकडे येण्याची तुम्ही वाट पाहणार की त्यांच्या जवळ जावून तुम्ही बोलणार माझ्याजवळून विकत घ्या?
आपला समाजात विकणाऱ्या व्यक्तीकडे हीन भावनेने पहिले जाते. असे समजल्या जाते , जो विकू पाहतो, त्यात काही कमी आहे. जर कोणती वस्तू तुम्ही चांगली बनवली आहे. लोकांचा ती वापरून फायदा होणार आहे. तर त्याची जाहिरात का करू नये? जर आपण जाहिरात केली नाही तर लोकांना आपल्याबद्दल कसे कळेल ? आपण जर फक्त असे बोललो कि माझा ग्राहक माझी प्रशंसा करेल तोच माझी जाहिरात. तर त्याप्रमाणे तुम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता किती वेळ लागेल ?
आपण काही विकतोय म्हणजे आपल्यात काही कमी आहे, हा न्यूनगंड मनातून काढून टाका. मी उत्पाद तयार केले आहे. मला वाटत लोकांचा ते उत्पाद वापरून फायदा होईल. हे उत्पाद लोकांपर्यंत पोहोचवणे त्याचे फायदे लोकांना कळविणे हे माझ काम आहे, हा विचार करा. तुमचा व्यवसाय तुम्हाला जर वाढवायचा नसेल, तर जाहिरात करू नका. पण तुम्हाला व्यवसायच वाढवायचा असेल, नवीन ग्राहक जोडायचे असतील, तर मात्र तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचावेच लागेल. कसे विकावे?
संयम
व्यवसाय करणे हे रात्रीच्या काळोखात दिव्याचा प्रकाशाकडे चालत जाणे आहे. आपल्याला कुठे जायचे हे आपल्याला माहित आहे. पण आपल्याला किती लांब जायचे आहे, हे आपल्याला माहित नाही. अंधारात आपल्याला अंदाज येत नाही कि तो प्रकाश किती दूर आहे. आपण त्या दिव्याच्या प्रकाशाकडे चालत राहतो. आपल्याला वाटत फार वेळ झाला आपण चालतोय. अजून किती दूर आहे तो प्रकाश? परत जाऊ का? कि दुसरा प्रकाश शोधू मी? असे अनेक प्रश्न आपल्या मनात यायला सुरवात होते.
व्यवसायात उतरताना आपल्याला आपल ध्येय माहित असत. आपला व्यवसाय आपल्याला केवढा वाढवायचा आहे. त्यात झालेल्या कमाईने आपण काय काय विकत घेऊ? याची पण यादी बनलेली असते. आपल यश कसे असेल, याच एक चित्र आपल्या डोक्यात असत. पण तिथपर्यंत कस पोहोचायचे? कधी पोहोचणार? पोहचू कि नाही? पोहोचलो तर टिकू का नाही? असे अनेक प्रश्न मनात येतात. या गोंधळातच अनेक जण माघार घेतात. व्यवसाय सुरु करण्याधी, अशा स्थितीचा विचार करा. या परिस्थितीमध्ये तुम्ही टिकून राहणार का?
कोका कोला कंपनी जेव्हा सुरु झाली तेव्हा ती दिवसाला ९ bottle विकत होती.आज कोका कोला कंपनी पूर्ण जगभर दिवसाला १९०००००००० एवढ्या bottle विकते. यावरून तुम्हाला कळून येईल कि व्यवसाय करताना किती संयम लागतो. फक्त ९ bottle विकल्या जातात म्हणून जर कोका कोला थांबले असते तर ते आज दिवसाला १९०००००००० एवढ्या bottle विकू शकले असते का?
वातावरण
तुमच्या व्यवसायामध्ये असे वातावरण असले पाहिजे कि कर्मचारी येऊन तुम्हाला नवीन कल्पना सांगू शकतील. त्यासाठी तुम्ही त्यांच्यावर रागावता वा बदला घेता कामा नये.
नेहमी घडणाऱ्या गोष्टींसाठी एक आदर्श नियमावली बनवली पाहिजे. म्हणजे तुमचे कर्मचारी दरवेळी तुमच्याकडे येणार नाहीत. त्यांना माहित असेल कि आपण अशा परिस्थितीमध्ये काय केले पाहिजे.
कर्मचाऱ्यांची प्रशंसा सर्वांसमोर करा, पण चुका एकट्यात काढा. तुमच्या व्यवसायामधल्या इतर सर्व गोष्टींची किंमत कमी-कमी होत जाईल, फक्त कर्मचारी सोडून. प्रशिक्षण आणि अनुभवामुळे कर्मचाऱ्यांची किंमत वाढतच जाईल. कर्मचारी आपले गुलाम आहेत, त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घ्या. असा दृष्टीकोन न ठेवता, कर्मचारी हे आपले व्यवसायाचे साथीदार आहेत, हा व्यवसाय वाढवायला तेच मदत करतील. असा दृष्टिकोन असावा.
तुम्ही व्यवसायाचे नेता आहात, तुम्ही निष्पक्ष ठाम, मैत्रिपुर्वक आणि दूरदृष्टी ठेऊन काम केले पाहिजे.
भाव करणे
कोणत्या वस्तूच मूल्य कशावरून ठरलं? समजा एक प्लॉट आहे, तो कोणी १० लाखात घ्यायला तयार आहे, तर कोणी ७ तर कोणी १५ लाखात. तर त्या प्लॉटच मूल्य काय? कोणत्याच गोष्टीला ठराविक मूल्य नसत. कोणत्याही गोष्टीच मूल्य हे घेणारा आणि देणारा हे दोघ स्वीकारतील ते असत. म्हणून व्यवसाय करताना आपल्याला भाव करता आला पाहिजे. भाव करताना कोणाकडे शक्ती आहे ते पहिले जाणून घ्या. हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती आवश्यक आहे.
भाव कशावर ठरतो?
माहिती – त्या सामानाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? भविष्यात त्याची किती उपलब्धता असेल? ते कोण विकत घेईल? ते कुठे विकत मिळेल? तुम्हाला जितकी जास्त माहिती तितकी तुमची बाजू मजबूत.
वेळ – माझ्या एका मित्राला अर्जंट फोटो फ्रेम हवी होती, त्याच्याकडे वेळ नव्हता, दुसऱ्या दुकानात फिरून भाव करायला. दुकानदाराला कळल, ह्या माणसाकडे वेळ नाही आहे. त्यामुळे तो त्याचा भाव सोडायला तयार नव्हता. लवकरात लवकर सामान पाहिजे असेल, तर त्याची जास्त किंमत मोजावी लागते.
Win-Win
भाव करताना सर्वात चांगली स्थिती कोणती? जिथे तुम्ही पण जिंकता आणि समोरचा पण जिंकतो. असे झाले तरच दोन्ही बाजूचे लोक खुश होतील. एकमेकांशी भविष्यात परत परत व्यवहार करतील. फक्त तुम्ही जिंकलात किंवा समोरचा जिंकला, तर तो व्यवहार परत होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते.
भाव करताना कधीच एका गोष्टीवर अडून राहू नका. अशा वेळी जिंकणे व हरणे केवळ हाच पर्याय उरतो. कधीच गृहीत धरू नका, समोरच्याला काय पाहिजे हे तुम्हाला माहित आहे म्हणून. प्रत्येक माणूस वेगळा आहे. भाव करताना तो वेगळा विचार करतो. पैसाच सर्वकाही नसतो भाव करताना. भाव हा नेहमी दोन पक्षांवर अवलंबून असतो.
नफा
व्यवसाय करण्याचा मूळ उद्देश हाच आहे कि नफा मिळवणे. यावर्षी आपण बातम्यांमध्ये पाहिले अनेक online कंपनी बंद झाल्यात. त्या कंपनी नफा बनवत नव्हता. नफा न बनवणारा व्यवसाय जास्त वेळ चालवणे फार कठीण काम आहे. वाढीसाठी कर्ज घेणे आवश्यक आहे. पण कर्ज किती घ्यावे? ते कसे फेडणार? हे तुम्हाला ठरवावं लागेल. सर्वात उत्तम हेच आहे कि, तुम्हाला होणारा नफा हा तुमच्या व्यवसायाच्या वाढीकरिता वापरावा. व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेणे जास्त धोकदायक आहे. त्यामुळे कर्जाच्या चक्रात सापडू शकता. तुम्ही सामान कितीला विकणार आहे? कितीला विकत घेणार आहे? तुमचा नफा किती? ह्याच गणित करूनच व्यवसाय सुरु करा.
अनेक लोकांना व्यवसाय सुरु करायचा असतो. काहीना तो चालवायचा असतो आणि फार कमी लोकांना तो टिकवायचा असतो. व्यवसाय करणे म्हणजे शिकत राहणे.
e4 team
(पोस्ट कॉर्नर+)™ (महत्त्वाचे बोलू काही)
या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये
आपलं स्वागत आहे.
इथे तुम्हाला विविध महत्त्वपूर्ण पुस्तकांचे रिव्ह्यू दिले जातात. यामध्ये उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, इंग्रजी, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!
तसेच पार्ट टाईम फ्रिलांसिंग जॉब्स आणि व्यवसाय या संदर्भात नव-नवीन कल्पना व वर्क फ्रॉम होमच्या संधी यांची माहिती मिळेल!
Start Career In Freelacing Field
Need
Whatsapp Group Admin
Online Book Seller
Online Spoken English Teacher
Marketing Executive
E4 Team Member
Website & App Developer
Helpline
**********9237
e***********@g*****.com